Friday, August 26, 2005

Coming back after two weeks - those were full of excitement actually. Discoverd the joys of computing in my own language - Marathi.

Got hooked up to this site - http://www.manogat.com and by following some posts therein, now I have my MS Office 2003 with Marathi menus.
हे एकदम झकास आहे !

Also published my first "attempted" gazal on manogat -

पहिली गज़ल

खुणावीत होते मज गहिरे मृगजळ कधी
आता रुक्ष पावसात कैकबार नाहतो

गुलाबास काटे इथे अन् गोडवा विषाला
असे नित्य तूझे अजब सरकार पाहतो

ज्ञानी म्हणे नव्हे खरा तो गाव आठवांचा
तरीही कधी या कधी त्या पार राहतो

कल्पिला न होता क्षण एकही तुझ्यावाचुनि
मात्र जिंदगीचे आता सात वार साहतो

उमजली न आम्हा रीत खरी या जगाची
फकीरही भणंग येथे गुलजार नार चाहतो

गमले न होतील स्वप्ने इतुकी खरी 'तृषार्त'
मिटलेल्या कळ्यांचाच केवळ भार वाहतो


By the way, 'तृषार्त' is my pen-name.

0 Comments:

Post a Comment

<< Home